शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेट्टींच्या भूमिकेने जयंतराव ‘टेन्शन’मुक्त : सदाभाऊ खोत यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:32 IST

अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकी त काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघाडी एकत्र येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील टेन्शनमुक्त झाले आहेत, तर भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या कृषी ...

ठळक मुद्देउमेदवार निवडीसाठी कसरत ; ‘स्वाभिमानी’ आता आघाडीसोबतगत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते

अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघाडी एकत्र येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील टेन्शनमुक्त झाले आहेत, तर भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना उमेदवार निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे.

खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांनी बांधलेल्या विकास आघाडीची बिघाडी झाली आहे; तर दुसरीकडे बिघडलेली काँग्रेसची घडी बसवण्याचा प्रयत्न खासदार शेट्टी यांच्यामुळे होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात शेट्टी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे; तर भाजपपुढे सध्या कोणताही चेहरा नसला तरी, अंतिम टप्प्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच गळ्यात उमेदवारी मारली जाण्याची शक्यता आहे.

खासदार शेट्टी आता काँग्रेस आघाडीसोबत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका दोन्ही कॉँग्रेस एकत्रित लढवणार असल्याचे भाकित राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यातील राजकारण उलट्या दिशेने वाहू लागले आहे. इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी विरोधात युवा नेतृत्व तयार करण्यासाठी खोत यांनी कंबर कसली आहे. शिराळ्यातही आमदार शिवाजीराव नाईक यांना ताकद देण्यासाठी खोत सरसावले आहेत. परंतु भाजपने दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार नाईक यांचे कार्यकर्ते आगामी विधानसभेला काय भूमिका घेणार, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

गत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते. यावेळी भाजपने पाटील यांना खिंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. बंदूक चालवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी, खांदा मात्र खोत यांचा आहे. खोत यांनी गेल्या वर्षभरापासून उमेदवार शोधमोहीम सुरू ठेवली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना पहिली पसंती दिली आहे. यानंतर आष्ट्याचे वैभव शिंदे, महाडिक गटाचे राहुल महाडिक, विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.लोकसभा निवडणूक : रंगतदार होणारराजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही शेतकरी चळवळीतील नेते आहेत. हे दोघे एकत्रित होते त्यावेळी त्यांच्यापुढे इतर पक्षांचा टिकाव लागत नव्हता. दस्तुरखुद्द जयंतरावांनाही त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते. परंतु आता हे दोघे विरोधात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आघाडीतर्फे खा. शेट्टी आणि भाजपतर्फे खोत यांचीच लढत निश्चित मानली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Politicsराजकारण